बेळगाव : मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगने यंदाचा स्वातंत्र्य दिन बेळगाव अग्निशमन दल कार्यालय आवारात साजरा केला.
सकाळी अग्निशमन दल विभागाचे अधिकारी आणि 120 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगच्या सदस्यांनी ध्वजारोहण केले.
अग्निशमन दलाचे जिल्हा अधिकारी – शशिधर निलगार आणि टीएफओ विठ्ठल टक्केकर तसेच मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगच्या अध्यक्षा ऐश्वर्या सारडा, उपाध्यक्ष सुधेंश चिंडक यांच्या नेतृत्वाखाली मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगच्या अन्य सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
याप्रसंगी प्रियांका तापडिया, नेतल जोशी, गौरव झंवर, श्रीराम भट्टड, वृषभ जाजू, देवांश सारडा, अंकुश अग्रवाल, गौरव जोशी आणि राहुल ओझा आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta