Wednesday , March 4 2026
Breaking News

स्वामी विवेकानंद सोसायटी येळ्ळूर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : स्वामी विवेकानंद सोसायटी येळ्ळूर यांच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा करण्यात आला. 75 व्या स्वातंत्र्य दिन एक वेगळ्या पध्दतीने येळ्ळूर गावातील निवृत्त सैनिकांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी निवृत्त सैनिक श्री. मारूती कंग्राळकर व दाजीबा पुण्याण्णांवर यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या फोटो पूजन करण्यात आले व माजी सैनिक श्री. यल्लापा धामणेकर यांच्याहस्ते ध्वजाचे पुजन करुन माजी सैनिक श्री. शिवाजी सुळेभावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून तिरंग्याला वंदन करण्यात आले, तसेच निवृत्त बॅंक कर्मचारी श्री. चांगाप्पा कोकणचे यांच्या हस्ते चांगळेश्वरी देवीच्या फोटो पूजन करून पाहुण्यांचा परिचय व सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील, उपाध्यक्ष श्री. परशराम धामणेकर, संचालक अविनाश पाटील, दिपक चौगुले, प्रदिप पोतदार, महेश देसाई, किरण पाटील, व्यंकटेश पाटील, कृष्णा बिजगरकर, भाऊराव पाटील वसंत कुगजी, शुभंम देसाई, संचालिका सौ. रूपाली कुगजी, सौ. साक्षी धामणेकर,लता पाटील, सुप्रिया चौगुले, कविता पाटील, भारता पाटील, रेखा पाटील, कर्मचारी सी.एस. पाटील, प्रियंका हुंदरे, रूपाली मेणसे, संगिता मेणसे, मयुर बागेवाडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक चेअरमन प्रकाश पाटील यांनी केले तर आभार प्रदिप पोतदार यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *