Thursday , June 4 2026
Breaking News

करंबळ शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्ट रूमचे उद्घाटन

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी हायर प्रायमरी शाळेत ७५व्या अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टर रूमचे उद्घाटन करण्यात आले.
रेणुका शुगर्सचे सिनियर मॅनेजर के. एम. घाडी यांनी आपले वडिल कै. मारुतीराव घाडी व आई कै. उर्मिला घाडी यांच्यास्मरणार्थ डिजिटल टीव्ही देऊ केली.
यावेळी रेणुका शुगर्सचे सिनियर मॅनेजर के. एम. घाडी व निवृत्त मुख्याद्यापक बी. बी. पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन केले
कार्यक्रमाला माजी तालुका पंचायत सदस्य महादेव घाडी, शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष सदानंद मासेकर, उपाध्यक्ष धनश्री घाडी, मराठा मंडळचे मुख्याध्यापक अनिल कदम, मराठी शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. पाटील, लैला शुगर्सचे इंजिनिअर राजेंद्र कुलम, गंगाधर दळवी, नाना घाडी, बी. एन. पाटील, पुंडलिक पाटील, दीपक कोडचवाडकर, राजू नार्वेकर, कल्लापा कोडचवाडकर, अविनाश घाडी, हेमंत घाडी, अर्जुन घाडी, महेश नार्वेकर, पांडुरंग पाटील, राघोबा मादार, देवानंद घाडी ब्रम्हानंद पाटील, गजानन पाटील, नारायण पाटील व सर्व एसडीएमसी सदस्य, सदस्या, शिक्षक वर्ग व गावकरी उपस्थित होते.
यावेळी के. एम. घाडी यांचा शाळेच्या वतीने एसडीएमसी अध्यक्ष सदानंद मासेकर व सदस्य यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार शिवणगेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *