बेळगाव : बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेत बेळगावच्या गोशीनारू कराटे संस्थेच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले.
बेंगळूर येथील गुंडूराव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, चेन्नई, मध्यप्रदेश, गोवा यास अन्य राज्यातील सुमारे 300 हून अधिक कराटेपटूंनी भाग घेतला होता.
नऊ वर्षाखालील वयोगटात गौरीश जगनवर याने सुवर्णपदक पटकाविले. याच गटात वेदांत कोनेरी याने तीन फेर्या जिंकून रौप्य पदक मिळविले तर सुकीन गलगली याने कांस्यपदक मिळविले.
14 वर्षाखालील वयोगटात यशराज पाटील, प्राची बापशेठ व श्रीधर किल्लेकर यांनी उल्लेखनीय खेळाचे दर्शन घडवीत रौप्य व कांस्यपदके मिळविली. तर मुलींच्या गटात वंदना कुरूप हिने रौप्य पदक मिळविले. 18 वर्षे वयोगटात सानिका खटावकर हिने पाच फेर्या जिंकून सुवर्णपदक पटकाविले.
या स्पर्धेसाठी मलेशियाहून सिहान वसंतन उपस्थित होते. वरील सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कराटेपटू मधु पाटील व आकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta