Wednesday , March 4 2026
Breaking News

बिबट्याच्या शोधार्थ विशेष मोहिम

Spread the love

 

बेळगाव : मागील पंधरा दिवसापासून गोल्फ कोर्सच्या मैदान परिसरात वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याला अद्याप यश आलेले नाही.
बिबट्याची दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळेच आज गोल्फ कोर्स परिसरात पोलीस अधिकारी आणि वनाधिकारी यांच्या टीमने बिबट्याच्या शोधार्थ विशेष मोहिमे हाती घेतली आहे. त्यामुळे गोल्फ कोर्स परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
गोल्फ कोर्स परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत असून यामुळेच वनविभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्ही, पिंजरे लावून देखील बिबट्या यामध्ये अडकला नसून यामुळे शोध मोहिमेत वाढ करण्यात आली आहे.
बिबट्या सातत्याने हुलकावणी देत असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वनविभाग पुन्हा नव्याने सज्ज झाला आहे. बिबट्याचे दर्शन तीन ते चार वेळा झाले असून गोल्फ कोर्स परिसरातच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस विभागाची मोठी टीम दाखल झाली आहे.
डीसीपी रवींद्र गडाडी, एसीपी एन. व्ही. भरमनी यांच्यासह शहर परिसरातील पोलीस अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू असून शेकडो पोलीस आणि मनपाचे कर्मचारी यात सहभागी झालेले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *