बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर मडिकेरी येथे अंडी फेकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आज युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
मडिकेरी येथे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकणार्यांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज बेळगावमध्ये युवक काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले. शहरातील चन्नम्मा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर म्हणाले की, भाजपने माजी मुख्यमंत्री आणि आमचे नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर अंडी फेकून आपली संस्कृती दाखवली आहे. त्यांचे कृत्य निषेधार्ह आहे.
बेळगाव शहर व ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्ते व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या निदर्शनांत भाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta