खानापूर (विनायक कुंभार) : खानपूरचे यापूर्वीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांची मध्यान्ह आहार जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी 24 जून रोजी झालेल्या बदली प्रक्रियेत यकुंडी यांची मुनिराबाद जिल्हा कोपळ येथे डायटचे प्रमुख व्याख्याते म्हणून बादली झाली होती. या पदावर हजर न होता ते बेळगावात बदली करून घेण्याच्या प्रयत्नात होते. यानुसार गुरुवारी झालेल्या बदली प्रक्रियेत लिलावती हिरेमठ यांच्या जागेवर त्यांची वर्णी लागली. तर हिरेमठ यांची बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे सचिव मल्लिकार्जुन रामचंद्रापा यांनी काढलेल्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी वर्गातील 12 अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta