
बेळगाव : येळ्ळूर येथील ग्राम देवता श्री चांगळेश्वरी मंदिर परिसरात गेली कित्येक वर्षाची मागणी आज ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केली पूर्ण येळ्ळूर येथील चांगळेश्वरी मंदिर समोर पिण्याच्या पाण्याचे फिल्टर मशीनचे आज उद्घाटन झाले. चांगळेश्वरी मंदीरला बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना यात्रा काळात व इतर दिवशी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत होती तसेच मंदिर समोर मराठी मॉडेल शाळा आहे या शाळेत जवळपास 450 विध्यार्थी आहेत. याची दखल घेऊन ग्राम पंचायतच्या माध्यमातून ग्राम पंचायत अध्यक्ष यांनी त्याठिकाणी फिल्टर प्लांट बसून थेतील पाण्याची समस्या दूर केली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, जोतिबा चौगुले, अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, दयानंद उघाडे, कल्लापा मेलगे, राजू डोंन्यानावर, सदस्या शांता काकतकर, समाजसेवक संदीप बा. पाटील, मराठी मॉडेल शाळेच्या शिक्षिका, निलजकर टीचर, मंडोळकर टीचर, ग्राम पंचायत सेक्रेटरी सदानंद मराठे व कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta