Monday , April 20 2026
Breaking News

शिंदोळी ग्रामपंचायतच्यावतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यामध्ये शिंदोळी ग्रामपंचायतच्यावतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी सुभेदार नारायण झुंजवाडकर यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. त्यानंतर माणिकवाडी गावात विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये अध्यक्ष राजेश पाटील यांनी माजी सैनिक नारायण झुंजवाडकर यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत बिरजे ग्रामपंचायत असोसिएशन खानापूर तालुका उपाध्यक्ष विनायक मुतगेकर, पुंडलिक पाटील व इतर मान्यवर होते. प्रास्ताविक शंकर गावडे यांनी मांडले आणि इतर सदस्य प्रीती परशुराम गोरल, गणपती सुतार, शांता कौंदलकर, प्रतिक्षा करलेकर, शांता मादार आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन क्लार्क प्रकाश कांबळे यांनी मांडले. तालुक्यामध्ये प्रथमच शिंदोळी ग्रामपंचायतच्या वतीने अध्यक्ष राजेश पाटील यांनी एक नवीन आदर्श घडून दाखविला.

About Belgaum Varta

Check Also

रौडीशीटरची शांतता बैठकीत हजेरी; काँग्रेसची नाराजी..

Spread the love  खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.एच. गौंडी यांनी आयोजित केलेल्या शांतता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *