बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अडीच कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी उद्यान नजिक उभारण्यात आलेल्या अद्ययावत अशा रवींद्र कौशिक लायब्ररीचे तसेच 2 कोटी 70 लाख रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या गतीमंद मुलांच्या उद्यानाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते रविवारी केले जाणार आहे, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
देशाकरिता सुमारे 26 वर्षे जीवन खर्ची घातलेल्या रवींद्र कौशिक यांच्या नावे शिवाजी उद्यान नजीक उभारण्यात आलेले वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. रवींद्र कौशिक यांची वहिनी आणि मुलगा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला जाणार आहे.
कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू अशा पाच भाषांचे वाङ्मय या डिजिटल लायब्ररीत वाचकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. जगात अशा प्रकारची विविधांगी लायब्ररी अन्यत्र कोठेही उपलब्ध नाही. यामुळे बेळगावकरांसाठी ही लायब्ररी एक पर्वणीच ठरणार आहे, असेही आमदार अभय पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बसवराज बोम्माई हे उद्या रविवारी सकाळी 9.30 वाजता गोवावेस येथील महावीर भवन सभागृहात होणार्या कार्यक्रमाला उपस्थित राहून बेळगाव महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित 32 नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत. यानंतर 2 कोटी 70 लाख रुपये खर्चून गतिमंद मुलांसाठी निर्माण करण्यात आलेल्या महात्मा फुले उद्यानाचे ते उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर यांच्या हस्ते रवींद्र कौशिक डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन केले जाणार आहे. या लायब्ररीमध्ये पाच भाषेतील विविध विषयावरील पुस्तके वाचकांना संगणकीय उपकरणाद्वारे वाचावयास मिळणार आहेत. स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त अशी पुस्तके या संगणकीय लायब्ररीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याशिवाय विद्यार्थी आणि लहान मुलांची बुद्धीमत्ता प्रकल्प करणारी पुस्तकेही येथे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. केवळ पन्नास ते साठ रुपयात वाचकांना स्मार्ट सिटी संगणक लायब्ररीत वाचनाचा लाभ घेता येणार आहे असेही अभय पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Check Also
बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Spread the love पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण …