संकेश्वर (महंमद मोमीन) : यमकनमर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांना घरी पाठविणेचा विडा राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी उचलला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मारुती अष्टगी अभिनंदन कार्यक्रमात मंत्रिमहोदयांनी जारकीहोळी यांना पाठवून देण्याची भाषा केली आहे. मंत्री उमेश कत्तीं म्हणाले, हुक्केरी विधानसभेची निवडणूक मी जिंकेन किंवा हारेन पण यमकनमर्डीत भाजपचा उमेदवार निवडून आणणार आहे. गेल्या १० वर्षांपासून यमकनमर्डी मतक्षेत्रातील जनतेने वाईट अनुभव घेतला आहे. एकीकडे यमकनमर्डी मतक्षेत्राचा विकास रखडला आहे. तर दुसरीकडे येथील आमदार जनतेशी निट बोलणे सोडा नमस्कार देखील करीत नाही. अशी व्यक्ती आमदार होता कामा नये. त्याकरिता त्यांना घरी बसविणेचा निर्णय भाजपाने घेतला आहे. यमकनमर्डीतून मारुती अष्टगी निवडून येतील किंवा आणखी कोणी येथे भाजपाचा झेंडा फडकणार यात कोणी शंका बाळगण्याचे कारण नाही. विधानषभेचा पहिला निकाल यमकनमर्डीचा नंतर हुक्केरीचा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुहेरी टोला लगाविला….
मंत्री उमेश कत्तीं यांनी आपल्या भाषणातून दुहेरी टोला लगाविलेला दिसत आहे. जारकीहोळी यांना आपण डिवचले तर ते आपणाला सोडणार नाहीत. याकरिता त्यांनी जिंकेन पेक्षा हारणेचा शब्द देखील बोलून दाखविला आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत मारुती अष्टगी जिंकतील किंवा आणखी कोणी याचा अर्थ मारुती अष्टगींचा पत्ता कट होण्याची शक्यता देखील वर्तविली आहे. त्यामुळे उमेश कत्तीं यांचे भाषण चांगलेच चर्चेत दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta