Wednesday , March 4 2026
Breaking News

हलगा येथील खुनी हल्ल्यातील आरोपीला अटक

Spread the love

 

बेळगाव : हलगा तारिहाळ रोडवर जैन बस्ती समोर धारधार शस्त्राने वार करून भररस्त्यात निर्घृण खून केलेल्या आरोपीला चार तासांतच पोलिसांना गजाआड केले.
मूळचा कोंडस्कोप गावचा सध्या शिंदोळी येथे वास्तव्यास असलेल्या गदगय्या रेवणय्या पुजारी (वय 40) याच्या मानेवर वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली होती.
कोंडस्कोप येथील विठ्ठल सांबरेकर (वय 38) हा व मयत गदगय्या हे दोघेही खास मित्र होते. गदगय्या हा काही महिन्यांपासून आपल्या पत्नीच्या गावी शिंदोळीत वास्तव्यास होता. हल्ला केलेल्या विठ्ठल सांबरेकर याने 2 वर्षांपूर्वी मयत गदगय्या याला 2 लाख रुपये दिले होते यातील त्याने 50 हजार रुपये परत केले होते बाकीचे पैसे देण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तगादा लावला होता. ज्यावेळी मागणी केली की त्या वेळी बेजबाबदारीची उत्तरे देत होता त्यामुळे विठ्ठलने गदगय्याचा काटा काढायचे ठरवले होते. त्यानुसार तो संधी साधून शुक्रवारी सायंकाळी त्याच्याच वाहनावरून गावाकडे जातीवेळी मधल्या मध्ये थांबून धारधार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून खून केला.
शुक्रवारी आरोपी विठ्ठल सांबरेंकर कोंडस्कोपहून शिंदोळीला आला होता त्यानंतर दोघेही सांबऱ्याला गेले त्यानंतर शिंदोळीहून कोंडस्कोपकडे जात होते. त्यावेळी गदगय्या हा दुचाकी चालवत होता तर विठ्ठल मागे बसला होता. हलगा येथे दुचाकी थांबवल्यावर मागे बसलेल्या विठ्ठल याने धारधार चाकूने मानेवर सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला व घटनास्थळावरून आरोपी विठ्ठल फरारी झाला होता.
घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोर्लिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी आदींनी पाहणी केली होती तर पोलीस निरीक्षक विजय शिन्नूर यांनी पंचनामा केला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंनूर यांनी तपासाची चक्रे फिरवत रात्री आरोपी विठ्ठल याला अटक करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *