बेळगाव : आज शिक्षक दिनानिमित्त बेळगाव येथील साईज्योती सेवा संघातर्फे न्यू इंग्लिश स्कूल बिजगर्णी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक व शिक्षक बसवंतप्पा बेनी, संतमीरा हायस्कूलच्या शिक्षिका वीणा जोशी, निर्मला देसाई, तसेच येळ्ळूर येथील वाय. एच. पाटील आदींना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना संघाच्या अध्यक्षा ज्योती निलजकर म्हणाल्या की, या दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शिक्षक हे आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. आपला वेळ देऊन ते आपले जीवन घडवतात. शिक्षक आपल्याला केवळ शिक्षणच देत नाहीत तर ते नेहमीच आपल्याला देशाचा चांगला नागरिक बनवण्याचा प्रयत्न करतात.
यावेळी न्यु इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक एस. पी. सोरगावी, संघाच्या उपाध्यक्षा ज्योती बाके, सेक्रेटरी सुमंगला पुजारी, सारिका सिंदगी, वीणा चौगुले, शीतल पाटील आदी तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta