


बेळगाव : दि. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जायंट्स प्राईड सहेलीतर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
व्यासपीठावर प्राईड सहलीच्या अध्यक्षा आरती शहा, उपाध्यक्ष स्नेहल शहा, अॅड. अशोक पोतदार, शिवाजी हंडे, राम जोशी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक आरती शहा यांनी केले. अशोक पोतदार, शिवाजी हंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना आकार देण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते आणि जन्म देते शिक्षक माणसाला जीवन देतो अशाच तीन शिक्षकांचा यामध्ये सीमा सुरेश सोलापुरे यांचा सत्कार शाल व मानचिन्ह देऊन अशोक पोतदार व शिवाजी हंडे यांनी केला.
मंजुषा पाटील यांचा सत्कार सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा व स्नेहल शहा यांनी केला. तर श्रीमती व्ही. जी. कुलकर्णी यांचा सत्कार त्यांचीच विद्यार्थिनी मोनाली शहा व रश्मी पाटील यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहल शहा यांनी मानले.
या कार्यक्रमाला प्राईड सहेलीच्या शीतल जाधव, प्रियंका दोशी, निरुपमा शहा, पूजा पाटील, उषा मेहता, रूपा मंगावती, रिया सिंग, अश्विनी रोकडे व इतर सदस्य उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta