


बेळगाव : दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून, मंगळा गौरी पुजेनिमित्त हा माझा धर्म पशू बचाव दलतर्फे मंगळा गौरी झिम्मा फुगडी स्पर्धा घेण्यात आल्या. आपली लोककला जी लोप पावत चालली आहे, लोप पावत चाललेली संस्कृती आणि परंपरा जपावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी काकती, कंग्राळी, खासबाग तसेच बेळगाव परिसरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. अशोक मनगुतकर, संगीता पाटील आणि रीना सोनोलकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले. या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला सुनिता गव्हाणे, ज्योती गवि आणि उपस्थित परीक्षकांना दादासो सूर्यवंशी यांनी सन्मान चिन्ह दिले. तसेच कविता मनगुतकर यांनी सर्व विजेत्यांना चषक दिले. स्पूर्थी ग्रुप (कंग्राळी खुर्द), धनलक्ष्मी ग्रुप (कंग्राळी खुर्द) आणि क्रांती महिला मंडळ (खासबाग) आणि यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
मनीषा प्रवीण सरदेसाई आणि इंद्रायणी रवींद्र जाधव यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले तर सूत्रसंचालन आशिष कोचेरी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta