बेळगाव (प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने गुरुवार दि. 8 रोजी विविध धार्मिक विधी व सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धा, पाककला स्पर्धा, गणपतीच्या आरतीचे ताट सजवणे, क्ले पासून गणपती मूर्ती निर्मिती, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवार दि. 8 रोजी सकाळी 8 ते 12 यावेळेत गणहोम व श्री सत्यनारायण पूजनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 12 पासून श्री मंडप परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. मंडळतर्फे घेण्यात आलेल्या
स्पर्धेमधील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षीस वितरण कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे. सर्व भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार आणि सेक्रेटरी शिवाजी हंडे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta