बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक व प्राईस सहेली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ हुतात्मा चौक येथे उत्साहात पार पडला.
व्यासपीठावर हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार, सेक्रेटरी शिवाजी हंडे, प्राईड सहेलीच्या अध्यक्ष आरती शहा होत्या. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सेक्रेटरी शिवाजी हंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
विजेच्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे
भाषण स्पर्धा : १ प्रथम रेडेकर, २ लावण्या सांबरेकर, ३ कृष्णकांत पाटील.
पाककला स्पर्धा
तिखट मोदक : १ तृप्ती यादव, २ रूपा अनगोळकर
गोड मोदक : १ उमा साठी, २ शितल प्रभावळकर
आरती थाली सजावट स्पर्धा : १ गौरी खांडेकर, २ श्रुती कुरणे
क्ले पासून गणपती बनवणे : १ विशाल शहापूरकर, २ अनुप्रिया पोटे, ३ तेजस प्रभावळकर
उत्तेजनार्थ
संस्कृती काकतकर
घरगुती गणपती सजावट स्पर्धा : नाईक ब्रदर्स, गजानन सावंत
विदूला कदम,
उत्तेजनार्थ
अनंत हंगीरगेकर, युवराज मोहिते
विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व रोक रक्कम देण्यात आले.
परीक्षक
सुधा माणगावकर, ज्योती पाटील, सीमा सोलापूर, मंजुषा पाटील, रितूल मुरकुटे
हे परीक्षक वरील स्पर्धांसाठी लाभले होते. त्यांचा सुद्धा सन्मान आज येथे करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी हंडे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्राईड सहलीच्या सदस्या व हुतात्मा चौकातील सर्व कार्यकारी सदस्य रामकुमार जोशी, राजकुमार कलघटगी, शाम सुतार, शेखर हंडे, वैजनाथ निश्चल, जुगलकिशोर जोशीं, अशोक कलबुर्गी, शशिकांत देसाई, प्रभाकर भेकणे, तानाजी भेकणे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta