Saturday , September 21 2024
Breaking News

साईज्योती सेवा संघाच्या सहकार्यामुळे महिला सुखरूप घरी पोहोचविण्यास मदत

Spread the love

 

बेळगाव (वार्ता) : साईज्योती सेवा संघाच्या सहकार्यामुळे निपाणी येथील संतुलन बिघडलेली एक महिला सुखरूप आपल्या घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, काल रात्री सुमारे 8.30 वाजता राणे साखरवाडी निपाणी येथील कमलाबाई शिंदे नामक आजी टिळकवाडी दुसरा रेल्वे गेट जवळ आढळून आल्या असता साईज्योती सेवा संघाच्या अध्यक्षा ज्योती निलजकर, सामाजिक कार्यकर्ते शेखर बसुर्तेकर व राजू वरपे तेथे तात्काळ दाखल झाले. ज्योती निलजकर यांनी त्या आजीची चौकशी केली असता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्या निपाणीहून टिळकवाडी भागात चालत आल्या असल्याचे समजले. ज्योती निलजकर यांनी पोलीस हेल्पलाईन ११२ शी संपर्क साधला असता हवालदार मडवाळ दाखल झाले.
त्यांनी त्या आजींची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करून त्यांना त्यांच्या साखरवाडी या गावी सुखरूप पोहोचविण्यास मदत केली. याकरिता तेथील नागरिकांनी ज्योती निलजकर, सामाजिक कार्यकर्ते शेखर बसुर्तेकर व राजू वरपे यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

“बेळगावचा राजा” चव्हाट गल्ली गणेश मंडळ यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मृत व जखमींना आर्थिक मदत

Spread the love  बेळगाव : गणेश उत्सव मंडळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्ली बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *