Wednesday , March 4 2026
Breaking News

पंतप्रधान मोदी ते महात्मा गांधी यांच्या जन्म तारखेपर्यंत भाजपच्यावतीने विविध उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्यावतीने दिनांक 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिनापासून दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जन्म दिनापर्यंत विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत राज्यसभा सदस्य इरणा कडाडी यांनी दिली आहे.
बेळगाव महानगर आणि ग्रामीण भाजपच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना इरणा कडाडी म्हणाले, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा पंधरवडा विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा केला जाणार आहे.
याप्रसंगी बोलताना एम. बी. जिरली म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळापर्यंत विकासाची गंगा आणली आहे. मागील आठ वर्षात विकासाचं वादळ मोदींनी तळागाळापर्यंत नेलं. त्यांच्या जन्मदिनापासून म्हणजेच 17 सप्टेंबर पासून भाजपच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या महात्मा गांधीजींनी समाजाला स्वच्छतेच्या महत्त्वाची देणगी दिली. त्यांच्या 2 ऑक्टोंबर या जन्मदिनापर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. या पंधरवड्यात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम, यासह ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे, असेही जिरली यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या पत्रकार परिषदेला खासदार मंगल अंगडी, माजी आमदार संजय पाटील यासह बेळगाव महानगर आणि ग्रामीणचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *