बेळगाव : बस आणि दुचाकीस्वार यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी गावाजवळ झाला. समोरून येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसला दुचाकीस्वाराची जोराची धडक बसली व भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार रेवप्पा बनवी (राहणार चिक्कनंदी, तालुका गोकाक जिल्हा बेळगांव असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रेवप्पा दुचाकीवरून गोकाकहून चिक्कनंदीकडे जात होता तर कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस उडपीहून गोकाककडे चालली होती. यावेळी चिक्कनंदी गावाजवळ बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत रेवप्पा यांचा जागीच मृत्यू झाला.
Belgaum Varta Belgaum Varta