बेळगाव : “बेळगाव वार्ता”च्या वतीने यावर्षी आकर्षक गणेश मूर्ती व आकर्षक सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सदर स्पर्धा बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण तसेच खानापूर तालुका मर्यादित होती. स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. चारही विभागातून अनेक स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
आकर्षक सजावट : प्रथम क्रमांकाचे मानकरी दक्षिण विभागातून नाथ गुंडू कर्लेकर (बाबली गल्ली, अनगोळ), उत्तर विभागातून प्रविणकुमार मुचंडीकर (कणबर्गी), ग्रामीण विभागातून भरत परशराम माळवी (खादरवाडी) तसेच खानापूर विभागातून संदेश कुंभार (स्टेशन रोड खानापूर) यांनी पटकावला आहे.
आकर्षक श्रीमूर्ती : दक्षिण विभागातून विशाल कंग्राळकर (इंद्रप्रस्थ नगर, गणेशबाग बेळगांव), उत्तर विभागातून दयानंद हुंदरे (शाहूनगर), ग्रामीण विभागातून राहुल रवींद्र उरणकर (विजयनगर, हिंडलगा) तसेच खानापूर विभागातून माणिक राघोबा देसाई (हलशीवाडी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta