Wednesday , March 4 2026
Breaking News

यूट्यूब चॅनेलवर बंदीची माहिती खोटी : जिल्हाधिकारी नितेश पाटील

Spread the love

 

बेळगाव : यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे, अशी ‘मीडिया रिलीज’ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. सदर माहिती दिशाभूल करणारी आणि सत्यापासून दूर आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.

युट्युब चॅनेलवर बंदी घातली जाईल अशी बनावट मीडिया घोषणा तयार करून सोशल मीडिया आणि विविध व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जात आहे. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. खोटी माहिती तयार करून ती सोशल मीडियावर शेअर करून विनाकारण गोंधळ घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *