बेळगाव : श्री विश्वकर्मा पांचाळ मनुमन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विश्वकर्मा मूर्तीचे दर्शन घेतले.
विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.
प्रशासकीय पातळीवर समाजाच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी किरण जाधव यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिली. तसेच संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचे कौतुक केले. तसेच महाप्रसादालही उपस्थिती दर्शविली.
याप्रसंगी कर्नाटक राज्य विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष बाबू पत्तार, विश्वकर्मा संस्थेचे अध्यक्ष भरत शिरोळकर, महिला विभागाच्या अध्यक्षा सुतार यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta