
शर्यत प्रेमींतून हळहळ
बेळगाव : संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीत नाव केलेल्या “नाग्या” या बैलाचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाची वार्ता बेळगाव परिसरात समजताच शर्यतप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.
वडगाव येथील शर्यत प्रेमी कै. परशराम मल्लाप्पा पाखरे यांनी 21 वर्षांपूर्वी “नाग्या” याला 1 लाख 62 हजार रुपयाला अंकलगी येथून खरेदी केले. अनगोळ येथे झालेल्या पहिल्याच शर्यतीत नाग्याने पहिला क्रमांक पटकावला आणि परिसरातील शर्यत प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला. नाग्याने आजवर 500 हून शर्यतीमध्ये पहिला क्रमांक मिळविला. त्याला हिंदकेसरी किताबही मिळाला आहे.
“नाग्या” ज्या वेळेला शर्यतीला जायचा त्यावेळी त्याच्याभोवती लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत जमा व्हायचे यामुळे नाग्याची प्रसिद्ध समजायची.
आज “नाग्या” अचानक निघून गेल्यामुळे पाखरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कारभार गल्ली वडगाव येथील श्री. मारुती परशराम पाखरे व श्री. संजय परशराम पाखरे यांच्या निवासस्थानाहून दुपारी 2 च्या सुमारास अंत्ययात्रा काढण्यात येणार असून सायंकाळी 5 वाजता वडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta