
बेळगाव : डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे उद्घाटन करणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
शनिवारी बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये बेळगांव येथे हिवाळी अधिवेशन होणार असून त्यावेळी बेळगांव शहरात प्रगतीपथावर असलेल्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
बेळ्ळारी हॉस्पिटलमध्ये जी समस्या झाली ती आमच्या बिम्स हॉस्पिटलमध्ये होऊ नये. ऑक्सिजनची कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच वीज खंडित झाल्यास ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी जनरेटर सज्ज ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
या आधी बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांची भेट घेतली. या बैठकीत दररोज दाखल होणार्या रुग्णांची माहिती घेण्यात आली. प्रत्येक दैनंदिन ओपीडीमध्ये जमा होणार्या पैशांची माहिती त्यांना मिळाली. प्रत्येक नित्यनियमित बायोमेट्रिक प्रणाली योग्य प्रकारे काम करायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, रक्तपेढी, क्ष-किरण 24 तास सेवा द्यावी.
यावेळी बीआयएमचे संचालक, जुन्या इमारतींची दुरुस्ती सुरु आहे, बाह्यरुग्णांसाठी जेवणाची खोली बांधु, रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करु, रुग्णांसाठी प्रतीक्षालय बांधण्याचा विचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर आमदारांनी अधिकार्यांसह रुग्णांना दिल्या जाणार्या जेवणाची पाहणी केली. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्या जनरेटरची पाहणी केली, नव्याने बांधलेल्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाची पाहणी केली.
यावेळी बिम्सच्या सीईओ शाहिदा आफरीन, सीएओ आणि एफ गौरीशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta