येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेताजी मराठी सांस्कृतिक भवन परमेश्वरनगर येळ्ळूर या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी संस्थेचे व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, संचालक भरतकुमार मुरकुटे, संजय मजूकर, के. बी. बंडाचे, सी. एम. उघाडे, किरण गिंडे, भोमानी छत्र्यांन्नावर यांच्या हस्ते दीप प्रजनन झाले. संचालिका अस्मिता पाटील यांनी नेताजी प्रतिमेचे पूजन केले. संचालक संजय मजूकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सभासदांचे स्वागत केले. यानंतर व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचे कर्मचारी वर्गाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सभेला उद्देशून बोलताना संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, यावर्षी संस्थेने तब्बल 50 कोटीहून अधिक रुपयांची वार्षिक उलाढाल केली असून, संस्थेकडे 25 कोटी रुपयांचे भाग भांडवल आहे. तर 25 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सभासदांना 15 कोटी रुपयांची कर्जे आम्ही वितरित केली आहेत. त्याचबरोबर यावर्षी संस्थेला निव्वळ नफा 3 लाख 50 हजार रुपये इतका झाला आहे. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे पार करत असून, संस्थेचे सभासद, संचालक, सल्लागार, कर्जदार व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्यातून संस्था दिवसेंदिवस प्रगती साधत आहे. संस्थेने परमेश्वरनगर येळ्ळूर येथे नेताजी मराठी सांस्कृतिक भवनची उभारणी करून, गावातील गरजू लोकांना लग्न व इतर कार्यक्रमासाठी अत्यल्पदरात हे भवन उपलब्ध करून दिले आहे. संस्थेची शिवाजी रोड येळ्लूर येथे सुंदर अशी स्वतःची इमारत आहे. त्याचबरोबर आत्ता संस्थेने वडगाव शाखेसाठी, कारभार गल्ली वडगाव या ठिकाणी स्वतःची इमारत खरेदी केली असून, लवकरच वडगाव शाखेचे स्थलांतर स्वतःच्या नवीन बिल्डिंगमध्ये करण्यात येणार आहे. संस्थेला सहकार्य करणाऱ्या सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांचे मनापासून त्यांनी आभार मानले. यानंतर संस्थेचे सेक्रेटरी दीपक हट्टीकर यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. तर चांगदेव मुरकुटे यांनी नफा तोटा पत्रकाचे वाचन केले. सौ. कांचन पाटील यांनी नफा विभागणी पत्रकाचे वाचन केले. तर अंदाजपत्रकाचे वाचन सौ. कल्याणी पाटील यांनी केले. यावेळी महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बबन कानशिडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन चेअरमन डी. जी. पाटील व व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक बबन कानशिडे यांनी सत्काराबद्दल आभार मानून संस्थेला भरभरासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक भरत कुमार मुरकुटे, प्रा. सी. एम. गोरल, के. एन. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक संजय मजूकर, भरतकुमार मुरकुटे, प्रा. सी. एम. गोरल, सी. एम. उघाडे, किरण गिंडे, के. बी. बंडाचे, बी. डी. छत्र्यांन्नावर, रवी गिंडे, परशराम गिंडे, प्रभाकर कणबरकर, गणपती हट्टीकर, पांडुरंग घाडी, अनिल पाटील, अनिल मुरकुटे, शंकर मुरकुटे, सौ. सुजाता गिंडे, पद्मा पाटील, लक्ष्मी मजूकर, रूपा मुरकुटे, रवी कणबरकर, मुक्ता लोहार, ज्योती यरमाळकर, संगीता दणकारे, सोनाली सायनेकर, वैष्णवी मुरकुटे, नेहा गोरल, लता गिंडे, दीक्षा नाईक आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. तर आभार संस्थेचे व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी मानले.