येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये उत्तम कार्य करणाऱ्या नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येथे खेळीमेळी वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. उदय जाधव हे होते. त्यांनी सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आणि सभासदांनी टाळ्या वाजवून समाधान व्यक्त केले.
संस्थेकडे 272 कोटीचे खेळते भांडवल, 37 कोटी रुपयांची गुंतवणूक, 250 कोटी रुपये ठेवी जमा आहेत. तसेच 213 कोटी रुपये कर्जे दिली आहेत. या आर्थिक वर्षात 72 लाख 26 हजार रुपये नफा झाला असेही ते म्हणाले.
प्रारंभी हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. नवहिंद भवन, “छत्रपती शिवाजी महाराज” सभागृहातील व्यासपीठावर चेअरमन उदय जाधव, व्हाईस चेअरमन संभाजी कणबरकर, संचालक पी. एस. मुरकुटे, सी. बी. पाटील, प्रकाश अष्टेकर, अनिल हुंदरे, एस. वाय. चौगुले, नीता जाधव, बी. आर. पुण्यान्नवर, प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन सौ. वैशाली मजुकर, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन दशरथ पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी येळ्ळूर येथील श्रेया सुरेश अंबोजी 98.72%, सानिका हनुमंत मुचंडी 98.40%, भावना भरमाना कंग्राळकर 90.88%, रामलिंग महेश मजुकर 87.36%, समृद्धी मारुती पाटील 98.56%, शिवानी बा. काकतकर 95.20%, बेबी गोपाळ बेडरे 86.86%, वैष्णवी इंद्रजीत पवार 83.36% तसेच बारावी परीक्षेत श्रुती सुनील बायनाचे 95.52% या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सभेत सदाशिवनगर शाखेचे व्यवस्थापक जे. बी. शहापूरकर यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. अडकूर शाखेचे व्यवस्थापक शरद गावडे यांनी ताळेबंद पत्रक सादर केले. उद्यमबाग शाखेचे व्यवस्थापक एस. के. बामणे यांनी नफा तोटा पत्रकाला मंजुरी घेतली. मुतगा शाखेचे व्यवस्थापक निलेश नाईक यांनी नफा विभागणी, वडगाव शाखेचे व्यवस्थापक दिनेश पाटील यांनी 2021-22 सालाच्या अंदाजपत्रकाचे वाचन केले. संस्थेचे असिस्टंट जनरल मॅनेजर एन. डी. वेरणेकर यांनी पोटनियम दुरुस्ती मंजूर करून घेतली.
सभासद पी. एच. पाटील यांनी संस्थेने गतिमान प्रगती साधली असल्याचे गौरवोद्गार काढले. नवहिंद क्रीडा केंद्राचे उपाध्यक्ष श्री. आनंद पाटील यांनी स्वागतगीत सादर केले.
सभेत सभासद वसुली अधिकारी जे. एस. नांदुरकर, हेड ऑफिस इनचार्ज विवेक मोहिते, संस्थेचे शाखा व्यवस्थापक मदन पाटील, सागर जाधव, पी. एस. घाडी संगीता कुगजी, सुमेश चौगुले, सचिन देशपांडे, रमाकांत देसाई, युवराज शिंदे, महांतेश अलगोंडी व कर्मचारी उपस्थित होते.
त्याचबरोबर नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते वाय. सी. गोरल, यल्लाप्पा देसुरकर, आनंद मजुकर, रामचंद्र कुगजी, वाय. एन. पाटील, पी. एन. कंग्राळकर, दत्ता उघाडे, नारायण बस्तवाडकर, बाळू दणकारे, आर. वाय. ठोंबरे, पी. ए. पाटील, नारायण कुंडेकर, श्रीधर धामणेकर, हनुमंत पाटील, सुधीर मानकोजी, प्रमोद जाधव, संतोष अष्टेकर, नितीन कुगजी, बबन कुगजी, मनोहर नायकोजी, निंगाप्पा पाटील, मनोहर गिंडे, अनंत कुलकर्णी, त्याच बरोबर नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या कार्यकर्त्या आवर्जून उपस्थित होत्या.
ढोलगरवाडी शाखेचे व्यवस्थापक विनोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश अष्टेकर यांनी आभार मानले.