बेळगाव : कावळेवाडी, बेळगाव येथे जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या शालेय कुस्ती क्रीडास्पर्धेत गावातील गुणवंत कुस्तीपटू पै. रवळनाथ श्रीधर कणबरकर याने 65 वजन गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर गरुडझेप घेतली आहे. रवळनाथ हा इयत्ता आठवीत असून बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी येथे शिकत आहे. मठमती कुस्ती आखाडा, सावगाव येथे सराव करीत आहे.
गावातील पहिली महिला कुस्तीपटू किरण य. बुरूड हिनेही गावच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरावर 49 किलोगटात बेळगाव जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. राज्यस्तरावर तिची निवड झाली आहे. माध्यमिक विद्यालय कर्ले येथे नववीत शिकत आहे. पै. किरणला वडिलांचे मोठे सहकार्य आहे. यांच्या यशाबद्दल गावाला मोठा अभिमान आहे.
या कुस्तीमल्लांचा इतर मुलांनी आदर्श घेऊन खेळाकडे अधिक लक्ष द्यावे यासाठी प्रोत्साहन म्हणून गावातील वाचनालयाचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी दोघांना दहा हजारचे बक्षीस जाहीर केले आहे. रोख रक्कम देऊन एका कार्यक्रमात सत्कार केला जाणार आहे.
या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta