बेळगाव : भरधाव वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील होळेम्मा मंदिराजवळ घडली.
सौंदत्ती तालुक्यातील चचडी गावातील मल्लनगौडा यल्लनगौडा पाटील (२२) आणि सिद्धारुद्ध वीरभद्र करोशी (२४) अशी मृतांची नावे आहेत.
भरधाव वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता एकाचा मृत्यू झाला असल्याचे समजते. हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
Belgaum Varta Belgaum Varta