Friday , November 6 2026
Breaking News

आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Spread the love

 

पुणे : केंद्र सरकारकडून ’दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ जाहीर करण्यात आला असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी याबाबत घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख ठरल्या आहेत. ठाकुर यांनी त्यांच्या नावाची घोषणा करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
भारतीय चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केला. पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे. 79 वर्षीय अभिनेत्री ’दिल देके देखो’, ’कटी पतंग’, ’तीसरी मंझील’ आणि ’कारवां’ यासारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. त्यांनी निर्माती दिग्दर्शक म्हणूनही ओळख मिळवली. पारेख यांनी 1990 साली आलेल्या प्रसिद्ध टीव्ही मालिका ’कोरा कागज’चे दिग्दर्शन केले होते.

About Belgaum Varta

Check Also

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love    ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *