Wednesday , March 4 2026
Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कित्तूर किल्ल्याची पाहणी

Spread the love

 

बेळगाव : शुक्रवारी कित्तूर येथील किल्ला आणि राजवाड्याला जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

कित्तूर संस्थानाच्या राजवाड्याबद्दल माहिती फलक तयार करावेत जेणेकरून पर्यटकांना किल्ला आणि राजवाड्याची माहिती मिळण्यास मदत होईल, यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती फलक लावण्याबाबत योग्य तो प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पावसापासून राजवाड्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, कित्तूर उत्सवादरम्यान लाईट अँड म्युझिक शो आयोजिण्यासंदर्भात पुरातत्व विभागाशी चर्चा करून आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी किल्ला परिसरातील वस्तुसंग्रहालयाचे क्युरेटर राघवेंद्र यांनी किल्ल्याची देखभाल व वस्तुसंग्रहालयाची अधिक माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ला परिसर आणि राणी चन्नम्मा यांच्या राजवाड्याची पाहणी करत ध्यानसाधना कोठडी, दरबार हॉल, स्वयंपाक घर आदींची माहितीही जाणून घेतली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही, कित्तूरचे तहसीलदार सोमलिंगाप्पा हलगी यांच्यासह पुरातत्व तसेच अन्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *