बेळगाव : बेळगावच्या टीम ढोलियातर्फे 8 ऑक्टोबर रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात रस रसिया-22 गरबा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रस रसिया कार्यक्रमाच्या समन्वयक ट्विंकल गांधी यांनी दिली.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तमा रुपाला यांच्या प्रेरणेने व बेळगाव जिल्हा भाजप नेते महांतेश कवठगीमठ, संजय पाटील, दिग्विजय सिदनाळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
रास गरबा नृत्य ही गुजराती नृत्य कला आहे. हे नृत्य विशेषत: नवरात्रीत केले जाते. बेळगावच्या विविध भागात सध्या नवरात्री दांडिया उत्सव सुरू आहेत. हा दांडिया महोत्सव संपल्यानंतर 8 ऑगस्ट रोजी रास गरबा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
रास गरबा नृत्यासाठी गुजरातमधून संगीतकार दाखल होणार आहेत. ध्वनी आणि प्रकाशासह विशेष आकर्षण असलेल्या मंचावर ही नृत्ये आयोजित केली जातील. या नृत्यात सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट नर्तकांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट नृत्यासाठी पारितोषिक पटकावणाऱ्यांना काश्मीरच्या पाच दिवसांच्या सहलीची संधी दिली जाईल, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत आयोजक विराल गांधी, राहुल गीते, दर्शन कलंत्री, मानसी कलंत्री आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta