खानापूर (प्रतिनिधी) : येळ्ळूर येथील विश्वभारत सेवा समिती संचालित श्री शिवाजी हायस्कूलचा खेळाडू दैवदीप देवानंद धामणेकर याने बेळगाव येथील क्रीडांगणावर शिक्षण खात्याच्या वतीने नुकताच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्रीडा शिक्षक संतोष मेलगे, मुख्याध्यापक मनोहर बाचीकर व सहशिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta