बेळगाव : येथील हिंडलगा कारागृहात पोक्सो कायद्यान्वये खटला सुरू असलेल्या कैद्याने रविवारी आत्महत्या केली.
कित्तूर तालुक्यातील बच्चनकेरी गावातील मंजुनाथ नायकर (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एका मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध कित्तूर पोलिस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याची चौकशी करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta