बेळगाव : खानापूरनजीक बेळगाव -खानापूर रेल्वे मार्गावर एका युवकाचा दोन तुकडे झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून हा आत्महत्या की खुनाचा प्रकार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
मयत युवकाचे नांव अरबाज आफताब मुल्ला (वय अंदाजे 24) असे असल्याचे समजते. काल मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली सापडल्याने त्याचे शिर आणि धड शरीरापासून अलग होऊन रेल्वे रुळाशेजारी पडले होते.
अरबाज हा मूळचा खानापूरचा रहिवासी असला तरी सध्या तो अंजनेयनगर बेळगाव येथे वास्तव्यास होता असे कळते. मृतदेहाची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाडला.
पंचनाम्याप्रसंगी मृत अरबाजचे हात बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार आहे की खून? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
तथापि उत्तरीय तपासणीचा अहवाल हाती आल्यानंतरच यावर अधिक प्रकाश पडणार आहे. सदर घटनेची बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
Check Also
राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्काराचा उद्या वितरण समारंभ
Spread the love बेळगाव : थोर समाजसुधारक राष्ट्रवीरकार शामराव देसाई स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक …