खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाड (ता. खानापूर) गावची लोकसंख्या तीन हजारहून अ़धिक आहे. परंतु गावाला वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने गावचे नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य खात्याकडे केली आहे.
जर गंदिगवाडात प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा उपलब्ध झाली तर गंदिगवाड परिसरातील हिरेमन्नोळी, अग्रोळी, तोलगी, तिगडोळी, तेगुर, आदी गावच्या नागरिकांची सोय होणार. तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी करण्यात आली.
गंदिगवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी बंदची हाक देताच माजी आमदार अरविंद पाटील घटनास्थळी दाखल होऊन समस्या जाणून घेतली. लागलीच तहसीलदार रेश्मा तालिकोटी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे उपस्थित राहुन निवेदनाचा स्विकार केला.
यावेळी गावचे नेते मंडळी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना यांच्यावतीने रविवारी आरोग्य तपासणी शिबीर
Spread the love खानापूर : खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या सौजन्याने …