Tuesday , March 3 2026
Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे योगदान अनन्यसाधारण : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

Spread the love

 

दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांची गोसावी मठाला सदिच्छा भेट

बेंगळुरू : बेंगळुरू येथील मराठा समाजाच्या गोसावी मठाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कर्नाटकातील मराठा समाजासाठी विशेष योजना राबविल्याबद्दल तसेच अनुदान मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्माई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, मराठा समाज हा कधीही पराभव स्वीकारणारा समाज नाही. मराठा समाज म्हणजे राष्ट्ररक्षणात सदैव पुढे राहणारा समाज. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती शुल्कात वाढ करण्याच्या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करून त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. मराठा समाजाने समाजकरणात, राजकरणात पुढे आले पाहिजे.
यावेळी बोलताना किरण जाधव म्हणाले की, मराठा समाजाच्या विकासासाठी व समृद्धीसाठी राज्य शासनाने मराठा निगम मंडळाची स्थापना करून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. अनुदानाची तरतूद करण्यात आली ही आनंदाची बाब आहे.
यावेळी गोसावी मठाचे मराठा समाजाचे श्री मंजुनाथ स्वामीजी, मराठा महामंडळ मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मूळे, सकल मराठा समाजाचे बेळगाव संघटक, भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव, गणेश केसरकर, रोहित साठे, मनोज शिंदे व मराठा समाजाचे प्रमुख उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *