बेळगाव : पूर्वी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत विविध सुविधा पोहोचत नव्हत्या. लक्ष्मी हेब्बाळकर या आमदार झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा कोणत्याही प्रकारची कसूर न ठेवता पोहोचवल्या जात आहेत, असे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षा मृणाल म्हणाले.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील ४९ लाभार्थ्यांना चारा कटिंग मशिन आणि ४१ लाभार्थ्यांना गाय मॅट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
याआधी कोणकोणत्या सुविधा आहेत जनतेला माहित नव्हत्या. पण आता तशी परिस्थिती नाही कारण आमदार स्वतः लक्ष देऊन सर्व सोयीसुविधा जनतेपर्यंत पोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम यांच्या हस्ते चारा कटिंग मशीन व मॅटचे वाटप करण्यात आले. यावेळी नारायण नलवडे, पुंडलिक भांदुर्गे, पद्मराज पाटील, जयवंत बाळेकुंद्री, गुरुनाथ पाटील, प्रकाश पाटील, होलेप्पा नाईक, सातेरी काकतीकर, पशुवैद्यकीय विभागाचे वैद्यकीय अधिकारी आनंद पाटील, महादेव तेली, दीपक यळीगार, लक्ष्मण जंबगी, परसाप्पा तेली, विवेक मल्लापुर, गुरुलिंग पत्तार, विठ्ठल संगनट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta