Thursday , September 19 2024
Breaking News

धर्मवीर संभाजीनगर सार्वजनिक सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : धर्मवीर संभाजीनगर वडगांव येथील नियोजित नूतन सार्वजनिक सांस्कृतिक भवनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 5/10/2022 रोजी दुपारी 2:00 वा. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजीराव जाधव, ज्येष्ठ वास्तूशास्त्र अभ्यासक सतीश निलजकर, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, सुहास हुद्दार, इंजिनियर राजू होनुले, प्लॅन अभियंता श्रीधर नावगेकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मारूतीराव जायण्णाचे हे होते.
प्रारंभी सचिव विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश मरगाळे यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. नेताजीराव जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सतीश निलजकर यांनी आयुधपूजन केले. मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 4 लाख रू, श्री गणेश मंदीर ट्रस्ट 2 लाख, प्रकाश मरगाळे 50,000, नेताजीराव जाधव 25,000, सतीश निलजकर 50,000, शिवाजीराव जाधव 5,000, वैशाली जाधव 5,000 यांनी नियोजित भव्य इमारतीकरिता देणग्या जाहीर केल्या.
बांधकाम कमिटीचे अध्यक्ष नारायण केसरकर, भाऊराव पाटील, परशराम नावगेकर, प्रदीप शट्टिबाचे, श्रीधर जाधव, प्रसाद यळ्ळूरकर, सचिन बांदिवडेकर, अभिजित केसरकर, धोंडिबा मोहिते, अमित सैनुचे, जी. बी. चिट्टी, महादेव मोरे, परशराम बगाडे, करवीर भंडारी, गोकुळ अकनोजी, मोहन मोरे, नटराज उपरी, सोमनाथ बसापुरे, सुधीर पाटील, प्रसाद पाटील, जयानंद कदम, जगदीश शट्टीबाचे, महेश मोरे, सूरज पाटील, प्रकाश पाटील, चेतन केसरकर, ओमकार कदम, विनायक अकनोजी, विनय पाटील, कौशिक जाधव, जयदीप जाधव, वैशाली जाधव, लता मोरे, नीता चंदगडकर, शांता येळ्ळूरकर तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *