बेळगाव : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विश्व भारत सेवा समिती संचलित हिंडलगा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र मोहन तरळे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी आणि आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती, चिकोडी यांच्या विद्यमाने कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातून आंतरराज्य गौरव पुरस्काराने भगवा फेटा, म्हैसूर हार, सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम बेळगाव अशोक नगर येथील धर्मनाथ भवन येथे नुकताच पार पडला.
यावेळी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, हिंगोलीचे आमदार निलेश लंके, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta