बेळगाव : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा वेळ उपलब्ध न झाल्यामुळे अखेर खासदार मंगल अंगडी यांच्याहस्ते बुधवार 12 ऑक्टोबर रोजी या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सकाळी 11 वा. याचे उद्घाटन करण्यात येणार असून, यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी आमदार अभय पाटील राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, खासदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशनचे अद्याप काम शिल्लक असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नोव्हेंबरमध्ये रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुल पूर्ण झाला आहे. यासाठी 33 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी उद्घाटनपूर्वीच या पुलाचा वापर सुरू केला.
Belgaum Varta Belgaum Varta