बेळगाव : वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांचे स्टॉल्स आयोजित करून ग्राहकांना वेगळी पर्वणी देणाऱ्या ‘गृहशोभा’ या बेंगलोरस्थित आयोजकातर्फे बेळगावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दि. 14 ते 23 ऑक्टोबर दरम्यान खानापूर रोडवरील मंगल मेटल शेजारच्या खुल्या जागेत १० दिवस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 70 हून अधिक मोठे स्टॉल्स भाग घेणार असून नागरिकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. गृहशोभा म्हणजे घराची सजावट. त्या सजावटीसाठी लागणारे फर्निचर, सोफा सेट्स, चेअर्स, पडदे, 3 डी फोटो, ज्वेलरी, गॅस स्टोव्ह, राजस्थानी चुरण, लोणची, लेडीज ड्रेस मटेरियल, कुर्ते पायजमा, लहान मुलांचे कपडे, खेळणी, स्वेटर्स, बॅग्स इलेक्ट्रिकल स्कूटर्स ,टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, केरळ आयुर्वेदिक तेल, म्हैसूर नमकीन, कॉस्मेटिक्स, फुटवेअर, खादी शर्ट ,कारपेट क्रोकरी आयटम्स, ड्रायफुटस, आयुर्वेदिक औषधे, राजस्थानी जूते, किचन वेअर्स, इलेक्ट्रीक स्कूटर अशा नानाविध साहित्याने नटलेले हे प्रदर्शन बेळगावकरांना निश्चित आवडेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta