बेळगाव : आज दि. १३ रोजी बेळगुंदी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर काळा-दिनसंदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले.
सदर जागृतीपर बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, माजी महापौर श्री. शिवाजीराव सुंठकर, सचिव एम. जी. पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, ऍड. सुधीर चव्हाण, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, बाबाजी देसुरकर, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, राजू किणेकर, किरण मोतनकार, रामा अमरोळकर, मारुती शिंदे, कल्लाप्पा चव्हाण तसेच गावचे नेते, कार्यकर्ते, इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta