Wednesday , March 4 2026
Breaking News

भारत जोडो पदयात्रेत ग्रामीण भागातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी

Spread the love

 

बेळगाव : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रेत सहभागी झाले.
दीडशेहून अधिक वाहनांमधून निघालेल्या कार्यकर्त्यांना चन्नराज हट्टीहोळी यांनी मार्गदर्शन केले. सर्वजण संध्याकाळी बेल्लारीतील फेरीत सामील झाले.
कर्नाटकात दाखल झालेल्या दिवसापासून बेळगावच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. आता चन्नराज हट्टीहोळी व ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्तेही उत्स्फूर्तपणे सामील झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *