Saturday , October 19 2024
Breaking News

जीआयटीचा दीक्षांत समारंभ संपन्न; 1124 पदवीधरांना पदवी प्रदान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील प्रतिष्ठित कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे तांत्रिक संस्थेचा (जीआयटी) 6 वा पदवीदान समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी एकूण 1124 पदवीधरांना पदवी देऊन गौरविण्यात आले.
कर्नाटक लॉ सोसायटीच्या उद्यमबाग, बेळगाव येथील जीआयटी संस्थेच्या ‘ज्ञानगंगा’ प्रांगणात आज संस्थेचा 6 वा पदवीदान समारंभ पार पडला. केएलएसच्या रौप्यमहोत्सवी सभागृहात आज, शनिवारी झालेल्या या शानदार समारंभात आंध्र प्रदेशच्या केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. एस. ए. कोरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पदवीदान भाषण केले. जीआयटीचे माजी विद्यार्थी व अशोक आयर्न ग्रुपचे सहव्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विद्याशंकर एस., व्हीटीयूचे कुलसचिव प्रा. ए. एस. देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मंडगी होते.
यावर्षी केएलएस जीआयटीने 779 बीई, 66 बी. आर्क पदवीधरांसह 845 पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यूजी विभागात गिरीश एम. प्रभुखानोलकर, मेकॅनिकल इंजिनीअरिंग यांनी सर्वाधिक 9.97 सीजीपीए मिळवले आहेत आणि श्वेता उगारे पीजीमध्ये एम.टेक. डिजिटल कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगमध्ये सर्वाधिक 9.97 सीजीपीए मिळवून कॉलेजचे नाव उंचावले आहे. एकूण 1124 पदवीधरांना तात्पुरत्या पदवीने सन्मानित करण्यात आले, ज्यात 53 एम.टेक., 108 एमबीए आणि 118 एमसीए विद्यार्थी आणि 279 पदव्युत्तर विद्यार्थी यांचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *