Sunday , December 14 2025
Breaking News

सरकारने ऊस दर निश्चित न केल्यास 21ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन

Spread the love

बेळगाव : कर्नाटकातील साखर कारखान्यांनी अजूनही 2700 रु. पर्यंतच दर ठेवल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ पहाता तो अजिबात शेतकऱ्यांना परवडत नसल्याने 5500 रु दर द्यावा म्हणून परवाच बेळगावमधे रयत संघटना, हरित सेनेतर्फे हजारो शेतकऱ्यांनी अशोक चौक ते चन्नम्मा चौकपर्यंत मोर्चा काढून नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहोरात्र आंदोलन छेडल्याने सरकार खडबडून जागे होत बेंगलोर विकाससौधमध्ये साखर मंत्री, आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांसह शेतकरी नेत्यांची प्रदिर्घ चर्चा झाली. तिथे आश्वसने दिली गेली पण येत्या 19 तारखेच्या आत जर सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा 21 ऑक्टोबरपासून शेतकरी राज्यव्यापी आंदोलन छेडतील, असा सरकारला आजच्या पत्रकार परिषदेत रयत संघटना अध्यक्ष चिवनाप्पा पुजारी यांनी दिला.

यावेळी ज्येष्ठ नेते शिवानंद मुगळीहाळ, राघवेंद्र नाईक, रवी सिध्दमण्णवर, प्रकाश नायक, राजू मरवे यांच्यासह इतर शेतकरी हजर होते.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *