बेळगाव : कंग्राळी के.एच. गावातील महिलांनी स्वयंरोजगारासाठी सुरू केलेल्या प्रथमेश महिला संघाची नोंदणी करणाऱ्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी संघटनेच्या सदस्यांना नोंदणी पत्र सुपूर्द केले.
स्वयंरोजगाराच्या आदर्शाकडे वाटचाल करणे हा चांगला विकास आहे. यासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य व मार्गदर्शन करण्यास तयार आहे. याशिवाय शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले.
यावेळी अध्यक्षा पूनम बेन्नाळकर, सरिता पाटील, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील व महिला संघाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta