बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील संतीबस्तवाड गावातील रमेश सुतार यांचे घर आगीच्या दुर्घटनेत जळून खाक झाले होते. त्यांच्या मदतीसाठी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर धावून आल्या.
युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांना तात्काळ पीडिताच्या घरी पाठवणाऱ्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी “कोणत्याही कारणाने घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” असे सांगून त्यांचे सांत्वन केले आणि लक्ष्मीताई फाऊंडेशनकडून आर्थिक मदतही देऊ केली.
याशिवाय पीडित कुटुंबाला कपडे, भांडी, पलंग, ब्लँकेट आणि आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.
रमेश सुतार यांच्या कुटुंबाला मदत करायची असेल तर ते त्यांच्या बँक खात्यात किंवा साहित्यरूपी मदत करू शकता तसेच फोनपेवर 7975120262 जमा करावे, अशी विनंती करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta