बेळगाव : दिवाळी हा सण तीमीरातून तेजाकडे नेणारा सण. उत्साहाने भरलेला हा सण प्रत्येकाच्या घरी आनंदाने साजरा करत असतात. या सणामध्ये प्रत्येकाच्या घरची साफसफाई केली जाते. नवीन तोरणे लावली जातात. आकाश कंदील लावला जातो. घराघरामधून खमंग फराळाचा वास दरवळत असतो. हा सण गरीब असा श्रीमंत आपल्या कुवतीनुसार साजरा करत असतात. नुसता उत्साहाने सळसळणारा सण म्हणजे दिवाळी.
आपण जेव्हा हा सण साजरा करत असतो तेव्हा समाजातील काही घटक या आनंदापासून वंचित राहतात. अशाच काही लोकांबरोबर प्राईड सहेलीने आपला दिवाळी सण साजरा केला. जुने जळगाव येथे बेघर घर आहे. जेथे २५ लोक राहतात जे दिवसभर इतरत्र काम करतात व रात्री निवाऱ्यासाठी येथे येतात अशाच बेघर घरमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी केली
आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आज सगळ्यांच्या घरी दिवे लागतात आपल्याबरोबर यांच्याही आश्रमात दिवे लागोत. तेथेही आकाश कंदील सजावा यासाठी प्राईड सहेलीने तेथे जाऊन आकाश कंदील लावला. रांगोळी काढली, तोरण लावले, फराळाचे वाटप केले व त्यांच्याबरोबर दिवाळी सण साजरा केला.
ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही देणे आपण द्यावे लागतो. समाजापासून उपेक्षित राहिलेल्या लोकांबरोबर दिवाळी साजरी करून आम्ही आज एक आत्मिक आनंद मिळवलेला आहे असे प्राईड सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा यांनी म्हटले आम्ही समाजासाठी काय करू शकलो तर त्याच्या आम्हाला आनंदच होईल.
या कार्यक्रमाला बेगर घरचे संचालक राहुल श्रीहट्टी, प्राईड सहेलीच्या सचिव जिग्ना शहा, रिया सिंग, रूपा मंगावती, रश्मी कदम उपस्थित होत्या.