बेळगाव : गणेश दूध संकलन केंद्रातर्फे दिवाळीचे औचित्य साधून म्हैस व गाईच्या दूध दरात शुक्रवार दिनांक 21 पासून पुन्हा वाढ करण्यात आली. गाय दुधाला प्रति लिटर 3 रुपये 50 पैसे तर म्हैशच्या दुधाला 2 रुपये प्रति लिटर दरवाढीसह बोनसही देण्यात येणार असल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक उमेश उर्फ प्रवीण देसाई यांनी दिले.
बेळगाव वेंगुर्ला राज्य मार्गावरील बेळगुंदी क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्रात झालेल्या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उमेश उर्फ प्रवीण देसाई म्हणाले की, 21 ऑक्टोबर पासून म्हशीच्या 6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफला 48 रुपये तर गाईच्या 3.5 फॅटला 8.5 एसएनएफला 35.50 दिले जाणार आहेत. शिवाय उत्पादकांना सहामाही बोनसही दिला जाणार आहे. हा दर दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी थेट शेतकऱ्यांना द्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.
पशुपालन करताना शेतकऱ्यांना परवडेल असा दर अपेक्षित असतो. उत्पादन खर्चाचा विचार करता दूध उत्पादकांना आनंदित ठेवण्यासाठी गणेश दूध संकलन केंद्र कटिबद्ध असल्याचे देसाई म्हणाले.
शेतकरी आणि दूध संस्थांच्या हितासाठी सातत्याने उपाययोजना आखल्या जात असल्याचे व्यवस्थापक सुधाकर करटे यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta